रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करताना सरपंच मनोज कोकाटे,उपसरपंच कल्पना ठोंबरे, ग्रा.सदस्य,ग्रामस्थ आदी...(छाया : सोहेल मनियार)
चिचोंडी पाटील : (प्रतिनिधी)
नगर - श्रीगोंदा मतदार संघाचे विद्यमान आमदार श्री.बबनराव पाचपुते यांच्या माध्यमातून चिचोंडी पाटील गावामध्ये कोट्यवधी रुपयांचे विकासकामे मंजूर असून या कामांमुळे गावामध्ये विकासपर्व सुरू असल्याचे प्रतिपादन भाजपा तालुकाध्यक्ष तथा चिचोंडी पाटील गावचे सरपंच मनोज कोकाटे यांनी केले.
ग्रामविकास विभागाच्या लेखाशीर्ष २५१५ अंतर्गत मंजूर झालेल्या १० लक्ष रुपयांच्या नगर - जामखेड रोड ते श्रीकृष्ण मंदिर पर्यंतच्या रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ गावातील आजी-माजी पदाधिकारी, जेष्ठ नागरिक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी बोलताना सरपंच कोकाटे म्हणाले की, वर्षोनुवर्षे प्रलंबित असलेला सदर रस्ता हा बाजारपेठेकडे जाणारा गावातील प्रमुख रस्ता असल्याकारणाने सदर रस्त्याचे काँक्रीटीकरण व्हावे अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामस्थांची होती.
ग्रामस्थांच्या भावनांचा विचार करून सदर रस्त्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने आमदार बबनराव पाचपुते यांच्याकडे निधीची मागणी केली होती. व त्यासाठी तात्काळ १० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे प्रतिपादन यावेळी कोकाटे केले.
सदर रस्त्यासाठी ताबडतोब निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने कल्याण ठोंबरे सर,माजी सरपंच अमोल कोकाटे, ग्रामपंचायत सदस्य वैभव कोकाटे, संदीप काळे, अतुल पवने यांनी आमदार पाचपुते यांचे मनोगत व्यक्त करून आभार मानले.
शुभारंभ प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष तथा चिचोंडी पाटील गावचे सरपंच मनोज कोकाटे, उपसरपंच कल्पनाताई ठोंबरे,ग्रामपंचायत सदस्य अर्चनाताई चौधरी, जयश्रीताई कोकाटे, यशोदाताई कोकाटे, सविताताई खराडे, वैभव कोकाटे, संदीप काळे, ज्ञानेश्वर ठोंबरे, भाऊसाहेब बेल्हेकर, प्रकाश कांबळे, दत्तात्रय धुळे, दीपक हजारे यांच्यासह जेष्ठनेते बाजीराव हजारे, पांडुरंग ससे, कल्याण ठोंबरे सर, आर एस कोकाटे, बाळासाहेब ठोंबरे, अमोल कोकाटे,महेश काका जगताप,भाऊसाहेब हजारे, बाबासाहेब नालकुल, भाऊसाहेब ठोंबरे, मेहमूद शेख, कासम शेठ, विजय कोकाटे, गजानन शेंदूरकर, रमेश ठोंबरे,चक्रपाणी ठोंबरे, अतुल पवने, गंगा कोकाटे, गणेश इंगळे, ताज महंमद शेख,नामदेव कोकाटे,पांडुरंग इंगळे,लिंबराज हजारे,एकनाथ कैदके,एकनाथ कोकाटे,चिंटू पाटेकर,दत्ता वाडेकर,गफूरभाई, बाबूशेठ, संपत हजारे, विजय गाडे, राहुल पवने,सचिन खडके,बाप्पू कोकाटे,अनिकेत जगताप, संतोष कोकाटे, अरुणाताई शेंदूरकर, रेखाताई दिलवाले, नालकुल ताई, ग्रामसेवक देविदास मोरे, राजू तनपुरे, बाळासाहेब बोरुडे उपस्थित होते...!
पत्रकार सोहेल मनियार
लोकमन महाराष्ट्र न्यूज
9284856967
No comments:
Post a Comment