साहित्याचे वाटप करताना खासदार सुजय विखे , मंत्री वीरेन्द्र कुमार आदी.(छाया : सोहेल मनियार)
चिचोंडी पाटील : (प्रतिनिधी)
अहमदनगर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार डॉ. सुजय विखे यांच्या अनमोल सहकार्याने प्रयत्नाने मोफत साधने शिबिराच्या वस्तू वाटप कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाला .
राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील मेमोरियल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय नामदार खा.डॉ. विरेन्द्र कुमार , सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री भारत सरकार यांच्या हस्ते शुभहस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी माजी विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला . यावेळी आमदार मोनिकाताई राजळे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे ,भाजपा शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे, अहमदनगरचे जिल्हाधिकारी माननीय श्री उमेश परहर सिव्हिल सर्जन साहेब , माननीय खासदार विखे साहेब यांचे स्वीय सहाय्यक किरण धावणे साहेब, आगरकर साहेब यांसह राजकीय पदाधिकारी, भाजपा पदाधिकारी ,विविध गावचे सरपंच, चेअरमन ,पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
वयोवृद्धांसाठी कमरेचा पट्टा मानेचा पट्टा ,पाठीचा पट्टा कंबुड संडास ,चालण्याच्या काठ्या ,पायातील चप्पल, यासारख्या एकदम जबरदस्त एक नंबर कॉलिटी च्या वस्तू या ठिकाणी माता पिता समान असणाऱ्या वयोवृद्धांना मोफत देण्यात आल्या.
या वस्तू पाहून वयोवृद्धांना अतोनात आनंद झाला आणि काहींना तर आनंदाश्रू आवरता आले नाही ,आपले मुलंसुद्धा या पद्धतीच्या वस्तू आणू शकत नाही परंतु अहमदनगर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सन्माननीय डॉक्टर ,सुजय दादा विखे साहेब यांच्यामुळेच या वस्तू या आम्हाला मिळाल्या अशा भावनासुध्दा काहि वयोवृध्दांनी व्यक्त केल्या .
अनेकांनी आदरणीय खासदार सुजय दादा विखे पाटलांची मनापासून आभार मानले ,यावेळी खासदार साहेब म्हणाले मला तुमची वयोवृद्धांची सेवा करीत राहावी असा आशीर्वाद द्या, मी माझ्या अहमदनगर जिल्ह्याचा विकासात्मक बदल नक्कीच घडून आणील माझ्या निधीतून अहमदनगर जिल्ह्याचा कायापालट करील परंतु माझ्या मतदार संघातील विकास कामांबरोबरच वयोवृद्धांची एवढी मोठी सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले खरोखरच मी आज मनापासून आनंदी आहे की वयोवृद्धांची सेवां करण्यामध्ये किती आनंद आहे.
फक्त मला तुमचा आशीर्वाद द्या का मी तुमच्यासारख्या वयोवृद्धांची अशीच सेवा करावी असेही ते म्हणाले या शिबिरासाठी वयोवृद्धांना शिबिराचे माहिती तसेच वयोवृद्धांना जास्तीत जास्त साहित्य मिळावे यासाठी भाजपा किसान मोर्चा अहमदनगर जिल्ह्याचे सरचिटणीस बबनराव शेळके यांनी प्रयत्न केले तसेच त्यांना ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर ठोंबरे,दत्तात्रेय वाडेकर यांनी विशेष सहकार्य केले.
No comments:
Post a Comment