अहमदनगर (प्रतिनिधी) - सोहेल मनियार
ग्रीन फील्ड सुरत हैदराबाद चेन्नई महामार्गासाठी अहमदनगर जिल्ह्यातून 4 तालुक्यातून 50 ते 55 गावातून 1250 हेक्टर जमीन संपादित होत आहे.नगर तालुक्यातील काही गावांचा सर्वे झालेला असून नगर-श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील चिचोंडी पाटील, दशमी गव्हाण, भातोडी, मदडगाव, सारोळा, कोल्हेवाडी, शहापूर या गावामध्ये मागील आठवड्यात सुरत हैदराबाद ग्रीनफील्ड महामार्गाच्या कर्मचाऱ्यांनी दर चार-पाच किलोमीटरवर मार्किंग केल्यामुळे या गावातील शेतकरी घाबरलेले आहेत व नुकताच पाऊस झाल्यामुळे शेतकरी पेरणीस व कांदा लागवड डाळिंब संत्रा मोसंबी लावण्यास संभ्रमात आहेत सदर महामार्ग साठी संपादित होत असलेले क्षेत्र व त्याला मिळणारा मोबदला इतर अधिग्रहण प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची मत विचारात घेण्यात यावे.
व प्रत्येक गावात ग्रीनफिल्ड महामार्गाच्या अधिकाऱ्यांना पाठवून प्रत्येक ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये जमिनीचे दर घोषित करून ते योग्य असल्याचे ग्रामपंचाय कारल्याकडून मान्यता घ्यावी द्यावी.
व महामार्ग शेतकऱ्यांच्या शेतातून आडवा तिडवा जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जमिनीचे त्रिकोणी षटकोनी तुकडे होणार आहेत.
त्यामुळे जमीन नापीक होण्याची भीती शेतकर्यांना वाटत आहे.
व मुख्य रस्त्यापासून शिवार रस्त्या पर्यंत पाऊलवाटा गाडी वाटा बंद होणार असून सदर शेती पडीक पडण्याची शेतकऱ्यांना शक्यता वाटत आहे.
तसेच ज्या जमिनीचे विभाजन होत आहे त्या ठिकाणी अंडर बायपास करण्यात यावेत व शेतकऱ्यांना विचारात घेतल्याशिवाय व दर जाहीर केल्याशिवाय शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण करण्यात येऊ नये या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना निवेदन देताना नगर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष शरद पवार,नगर तालुका अध्यक्ष रोहिदास कर्डिले, जिल्हा सरचिटणीस प्रकाश पोटे, केशव बेरड, विजय मिसाळ आदी उपस्थित होते.
सदर शेतकरी व अधिकारी यांच्यामध्ये संयुक्त बैठक घेऊन विविध अडचणी दूर करण्यात यावे व शेतकऱ्याचे कुठलेही नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जमिनींचे हस्तांतरण केल्यास तीव्र विरोध केला जाणार आहे .
जमिनीची कुठलीही मोजनी व कुठलीही अधिग्रहनाची प्रक्रिया पार पाडू देणार नाही. व शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.









No comments:
Post a Comment