लोकमन महाराष्ट्र न्यूज
चिचोंडी पाटील (प्रतिनिधी) : सोहेल मनियार
सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गाच्या केंद्रीय दिशादर्शक समितीचे चेअरमन खासदार सदाशिवराव लोखंडे यांना निवेदन दिले.
ग्रीनफील्ड महामार्ग जात असणाऱ्या व नव्याने सर्वे केलेल्या नगर चिचोंडी पाटील,दशमी गव्हाण भातोडी,मदडगाव,कोल्हेवाडी, सारोळा,शहापूर येथील गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत,
यामध्ये शेतकऱ्यांचे बागायती जमीनी,घरे,गोठे, भुसारे,पाईपलाईन,विहीरी,शेत तलाव, फळबाग,पोल्ट्रीफार्म, शेड, यासारखी शेती उपयोगी साधनांचे मोठे नुकसान होत असून व या साधनसामुग्रीची सातबारा तलाठी रेकॉर्डला नोंद करून घेण्यात यावी.
नगर जामखेड नगर पाथर्डी हायवे लगतच्या जमिनी बाबत संबंधित ग्रीनफिल्ड महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी लवकरच बैठक लावून जमिनीचे व सर्व नुकसान होणाऱ्या साधनसामग्रीचे भरपाई चे दर जाहीर करावे.
शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन भूसंपादनाची पुढील प्रक्रिया सुरू करावी,ही मागणी नगर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अध्यक्ष शरदभाऊ पवार,नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष रोहिदास पाटील कर्डिले, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस प्रकाशजी पोटे, व शेतकरी यांनी खासदार लोखंडे साहेब यांच्याकडे केली,
ग्रीनफिल्ड महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांची पुढील आठवड्यात शेतकऱ्यांसोबत संयुक्त बैठक लावू असे आश्वासन लोखंडे साहेब यांनी दिले,








No comments:
Post a Comment