श्री क्षेत्र नांदूर,कपारीच्या विठोबाचे मंदिर, इन्सॅट मध्ये स्वयंभू मूर्तीचा तांदळा...( छाया : सोहेल मनियार चिचोंडी पाटील )
चिचोंडी पाटील ( प्रतिनिधी ) : सोहेल मनियार
आषाढ महिना लागला की अवघ्या महाराष्ट्राला वेध लागतात विठुरायाच्या वारी व दर्शनाचे. प्रति पंढरी किंवा धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नांदूर विठ्ठलाचे येथे आषाढी एकादशी निमित्त रविवार दि.१०-७-२०२२ रोजी भव्य अशी यात्रा भरत आहे. ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही ते भाविक भक्त एक दिवसाची का होईना पायीवारी व दिंडी घेऊन विठ्ठल दर्शनासाठी येथे येतात.
आषाढ महिना लागला की अवघ्या महाराष्ट्राला वेध लागतात विठुरायाच्या वारी व दर्शनाचे. प्रति पंढरी किंवा धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नांदूर विठ्ठलाचे येथे आषाढी एकादशी निमित्त रविवार दि.१०-७-२०२२ रोजी भव्य अशी यात्रा भरत आहे. ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही ते भाविक भक्त एक दिवसाची का होईना पायीवारी व दिंडी घेऊन विठ्ठल दर्शनासाठी येथे येतात. श्री क्षेत्र नांदूर विठ्ठलाचे हे गाव अहमदनगर जामखेड रोडवर नगर पासून 30 कि.मी.अंतरावर व बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवर हायवे पासून दोन कि.मी.आत मध्ये व कडा धानोरा पासून वीस कि.मी.असून गर्भगिरी पर्वत रांगेत निसर्गरम्य मेहेकरी नदीकाठी वसलेले आहे.
टेकडी मधील काळ्या पाषाणात,कपारीत भक्तांच्या इच्छे खातर प्रकट झालेले पंढरीचे पांडुरंग स्वयंभू रूपात आहेत म्हणूनच कपारीचा विठोबा म्हणून ख्याती आहे.त्यांच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीला लाखो भाविक भक्त येथे येतात.लाखो विठ्ठल भक्त हातात टाळ,मृदंग,भगवा पताका घेऊन कोणी पायी तर कोणी वाहनाने दिंड्या घेऊन येतात. विठ्ठलाच्या चरणावर नतमस्तक होऊन डोळे भरून विठ्ठलाला पाहून दर्शन घेऊन तृप्त होतात.









No comments:
Post a Comment