तालुका प्रतिनिधी -
नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील जागृत देवस्थान श्री शुढळेश्वर महादेव मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त अभिषेक,पाठपूजा करण्यात आली. यावेळी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने हातात टाळ, मृदुंग, भगव्या पताका घेऊन कोणी पायी तर कोणी वाहनाने दिंड्या घेऊन देवाच्या चरणी नतमस्तक होतात.सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपूर्ण वर्षभरामध्ये साधारण १४ एकादशी येतात. पण त्यातही आषाढी एकादशीला खूपच महत्त्व देण्यात येते या दिवशी खास एकादशीच्या शुभेच्छा दिल्या जातात.
अगदी पुराणापासून आषाढी एकादशी महत्त्वाची मानली जाते.मराठी वर्षानुसार आषाढ महिन्याचा शुद्ध पक्षामध्ये येणारी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी या एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते.महाराष्ट्रात आषाढी एकादशीला एक वेगळीच स्थान आणि महत्त्व आहे.
शुढळेश्वर देवस्थान गुंडेगावचे दैवत असून महाराष्ट्र शासन तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात 'क' वर्गात या देवस्थानाचा समावेष झाला असून विविध विकास कामे येथे होणार आहेत.तसेच मंदिर परिसरात तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांच्या निधीतून भव्य भक्तनिवास उभारण्यात आले आहे.तसेच ग्रामस्थांच्या सहभागातून मंदिराची शिखराचे व रंगरंगोटीचे काम केले असून शुभकार्यासाठी, सप्ताह, किर्तन, तसेच धार्मिक कार्यासाठी भव्य सभामंडप उभारले आहे.
कोरोनामुळे दोन वर्षापासून शुढळेश्वर मंदिर येथील सर्व धार्मिक कार्यक्रम बंद होते. परंतु या ठिकाणी यावर्षी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती पहावयास मिळाली.यावेळी भाविकांसाठी फराळ,पिण्याचे पाणी, येणाऱ्या दिंड्यांचे स्वागत, भजन व्यवस्था करण्यात आली होती.यावेळी गुंडेगाव नागरिक व शुढळेश्वर मित्र मंडळ धावडेवाडी यांनी नियोजन केले आहे.
चौकट...
गुंडेगाव येथील ग्रामदैवत श्री शुढळेश्वर महादेव मंदिर हे हेमाडपंथी असून पुराणकाळापासून शेकडो वर्षांपासून निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे महादेव मंदिर आहे.या ठिकाणी महान तपस्वी मांडव्य ऋषी,गुंड ऋषी मुनींनी तपश्र्चर्या केली आहे.या देवस्थानचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास सुरू आहे.पर्यटकांना येथे सहलीसाठी जाण्याची संधी मिळाली तर अवश्य येऊन दर्शन घ्यावे.समाधान वाटावं असे हे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले ठिकाण आहे.
दादासाहेब आगळे - गुंडेगाव इतिहासप्रेमी







No comments:
Post a Comment