लोकमन महाराष्ट्र न्यूज (प्रतिनिधी) :सोहेल मनियार
काल रात्री अज्ञात समाज कंटकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तथा जनआधार सामाजिक संघटनेचे प्रकाश पोटे यांच्या गाडीवर,भ्याड हल्ला करून केला आहे.
गाडीवर झालेले दगडफेकीनंतर प्रकाश पोटे म्हणाले मी करत असलेल्या निर्भिड कामापासून रोखण्याच्या व माझ्या मनात भीती घालविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला...अशा बुध्दीहिन,लोकांचा जाहीर निषेध.... अशी प्रतिक्रिया प्रकाश पोटे यांनी दिली.
पोलीस यंत्रणेने लवकरात लवकर सदर घटनेचा तपास करावा अन्यथा अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे यांनी दिला.




No comments:
Post a Comment